News 34 chandrapur
चंद्रपूर - 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा चंद्रपुरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक भागात पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. Heavy rainfall 9 ऑगस्टला हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देत, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.
मुसळधार पावसाने शहरातील रहमतनगर व सिस्टर कॉलनी भागात पुन्हा नदीचे पाणी शिरले, अनेक घरे पाण्याखाली आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. Flood situation
प्रशासनाने पुराची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासन किती दिवस मदत करणार, एकदा समस्येचा तोडगा काढा, नदीकाठी असणारे अवैध अतिक्रमण प्रशासनाने काढावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. Flood 2022
चंद्रपूर वरून चोराला जाणारा मार्ग पावसाने पूर्णपणे बंद झाला आहे.
रहमतनगर व सिस्टर कॉलोनी भागात तिसऱ्यांदा ही परिस्थिती उदभवली आहे.
पाऊस आला की पाण्याची पातळी वाढते आणि अचानक आम्हाला दिवसा किंवा रात्री दुसरीकडे आश्रय घ्यावा लागत आहे अशी खंत नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. Chandrapur flood
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्यात त्यांनी अतिक्रमण काढण्याचे प्रशासनाला निर्देश दिले होते, मात्र त्यांच्या निर्देशावर कसलीही कारवाई न झाल्याने नदी व नाल्याचे पाणी पुन्हा शहरात शिरले. Ajit pawar