News34 chandrapur
चंद्रपूर - पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्ष 2017 ला परिसरातील minor girl एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तब्बल 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.आरोपी प्रशांत उर्फ कपिल मोरेश्वर चुदरी याने अल्पवयीन मुलीला वर्ष 2017 ला पळवून नेले होते, त्यांनतर त्या अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केला.
पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. 20 years imprisonment for the rapist
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 376 (2) आयजेएन व पोक्सो लावत आरोपी वर गुन्हा दाखल केला. Chandrapur police
आरोपीला अटक केल्यावर महिला पोलीस अधिकारी अश्विनी वाकडे यांनी प्रकरण तपासात घेत आरोप निष्पन्न करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
22 ऑगस्ट 2022 ला अतिरिक्त जिल्हा सह न्यायाधीश दीक्षित यांनी आरोपी प्रशांत चुदरी ला 20 वर्षाची शिक्षा व 15 हजार रुपये दंड ठोठावला.
सदर प्रकरणी न्यायालयात सरकारी वकील स्वाती देशपांडे व पोलीस कर्मचारी मधुराज रामनुजवार यांनी काम बघितले.
