News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील जलनगर भागात राहणारा MR 33 वर्षीय मोसीम नईम शेख हा मला गडचिरोली ला काम आहे असे सांगत घरून निघाला मात्र तो आजपर्यंत घरी व गडचिरोली येथे आढळून आला नसल्याने मोसीम यांचा लहान भाऊ मोईन यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये मोठा भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. Youth missingमोसीम हा आधी MR (Medical Representative) म्हणून काम करीत होता, परंतु 2 महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडली त्यांनतर तो घरी राहत होता.
22 ऑगस्टला सकाळी 7 वाजता मोसीम ने पत्नी व लहान भाई नईम ला मी गडचिरोली जात आहे असे सांगून घराबाहेर निघाला.
8 वाजता मोसीम चा मित्र घरी आला व मोसीम कुठे गेला याबाबत विचारणा केली, तर त्याच्या भावाने तो गडचिरोली गेला असल्याचे सांगितले, मोसीम ला यावेळी मोबाईल वर सम्पर्क करण्यात आला मात्र त्याचा मोबाईल घरीच होता.
मोसीम सायंकाळी घरी परतणार या आशेवर सर्व त्याची वाट बघत होते, मात्र तो घरी परतलाच नाही, त्याकरिता मोईन ने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.
मोसीम बाबत कसलीही माहिती मिळाल्यास मोबाईल क्रमांक 7798980807 वर सम्पर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

