News34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्रातील सावंतवाडी, जिल्हा सिंधुदूर्ग येथील विष्णु पांडुरंग दळवी हा कलकाम रिअल इन्फ्रा (इं.) लि. मुंबईचा चेअरमन असुन विजय सुपेकर आणि सुनिल वांद्रे हे सिनिअर डेव्हलपमेंट डायरेक्टर आणि अनील पासवान व मोहम्मद इद्रिस सर्व राह. नालासोपारा, मुंबई हे युनीट हेड म्हणुन कार्यरत होते. त्यांनी विदर्भात प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, गडचांदूर, मुल, ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, नागपुर, बुट्टीबोरी, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा इत्यादी ठिकाणी कार्यालय उघडले. Scamविदर्भातील कार्यालयीन कामकाजाकरिता विदर्भ प्रमुख म्हणुन विदेश प्रभाकर रामटेके, बियाणी नगर, तुकूम चंद्रपूर तसेच विजय वासुदेव येरगुडे राहणार चव्हान कॉलनी, तुकूम चंद्रपूर यांची नियुक्ती केली. Kalkaam news
विदर्भाची संपुर्ण आर्थिक जबाबदारी सदर दोन्ही व्यक्तिकडे होती. त्यांनी विदर्भातील चंद्रपूर येथे जवळपास 200 एजंटाची नेमणुक करून कंपनी बद्दल खोटी माहिती सांगीतली. कंपनी विविध क्षेत्रात काम करीत असुन कंपनीचा व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेशी आहे. भरघोस intrest व्याज, ठराविक वर्षाने दामदुप्पटीचे आमिष दाखवून चंद्रपूर जिल्हयातुन जवळपास 40 ते 50 कोटी रूपयांची investment करवली असुन दोन्ही व्यक्तीने चंद्रपूर जिल्हयात स्थानिक स्तरावर बनावट कंपनी fake company कलावती आणि तनिष्का स्थापित केली व गुंतवणुकदारांचा यात पैसा गुंतवला आहे. सन 2019 मध्ये अनेकांच्या ठेविची मुदत संपली तेव्हा ग्राहकांनी मॅच्युरिटीची रक्कम मागण्यास सुरूवात केली असता एक महिण्यांनी 15 दिवसांनी पैसे मिळतील म्हणुन विदेश रामटेके आणि विजय येरगुडे बहानेबाजी करायला लागले. त्यामुळे एजेंट, ग्राहकांना संशय आला व त्यांनी मुंबई गाठली आणि चेअरमन विष्णु पांडुरंग दळवी, 2 सिनिअर डेवलपमेंट डायरेक्टर विजय सुपेकर आणि सुनिल वांद्रे यांची पांच ते सहा वेळा भेट घेतली असता त्यांनी सुध्दा तीच बहानेबाजी केल्याचा अनुभव आला. मॅच्युरीटी होवुन तिन वर्ष झाले तरी परतावा अद्याप पर्यंत मिळालेला नाही. Maturity
या घटनाक्रमाने हादरलेल्या एजंट व ग्राहकांनी शेवटी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस अधिक्षक जिल्हा चंद्रपूर यांचे कडे दिनांक 10/05/2022 ला तक्रार नोंदवली व त्याची प्रतिलीपी जिल्हाधिकारी चंद्रपूर, पालकमंत्री चंद्रपूर, पोलीस महानिरीक्षक मुंबई, पोलीस आयुक्त नागपुर विभाग नागपुर, महसुल मंत्री, महा.राज्य मुंबई, राज्यमंत्री, सामाजीक न्याय मुंबई, महाराष्ट्र उद्योग व खनीज मंत्री मुंबई महाराष्ट्र यांचे कडे माहितीसाठी व उचित कारवाईसाठी पाठविली. या संदर्भात विदेश रामटेके याला दिनांक 17/05/2022 एम.पी.आय.डी. अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आहे.तद्नंतर शरद पवार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांची भेट घेतली. Lure of exorbitant interest
त्यांनी विषयाचे गांर्भीय ओळखुन जिल्हा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर आणि दिनांक 23 मे 2022 रोजी माननीय नामदार प्राजक्त तनपुरे साहेब, राज्यमंत्री महाराष्ट्र तसेच संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिनांक 6 जुन 2022 ला विषयांकित निवेदन सादर केले. दोन्ही महोदयांनी पोलीस अधिक्षकाऱ्यांशी संपर्क केला असता विदेश रामटेकेला अटक केली असुन विजय येरगुडे अजुनही फरार आहे. कंपणीचे चेअरमन विष्णु पांडुरंग दळवी आणि सहकाऱ्यांवर अजुनही कुठलीच कारवाही करण्यात आलेली नाही असे सांगीतले. Deception of citizens
सदर प्रकरणाची तक्रार / निवेदन देवुन एक महिण्याचा कालावधी होत आहे परंतु आता पर्यंत प्रकरण गतीमान करण्यात आले नाही व फरार आरोपीस अटक करण्यात आली नाही.
सदर प्रकरणातील फरार आरोपी विजय येरगुडे याला अटक करण्यात यावी. तसेच कंपनीचे मुख्य संचालक विष्णु पांडुरंग दळवी व त्यांच्या सहकार्यावर आता पर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे त्या दिशेने तपास करून त्यांना सुध्दा गजाआड करावे आणि एजंट, जेष्ठ नागरीक, शेतकरी, विधवा महीला, रिक्षा चालक, भूमीहीन, श्रमकारी, गरीब कष्टकरी सद्यापरिस्थित त्यांचे दुःख पाहुन मन हेलावेल अशा गुंतवणुकदारांना त्यांचा गुंतवणुकीचा परतावा मिळवुन देवुन त्यांना सामाजिक, आर्थिक व वैयक्तिक न्याय मिळवून द्यावा ही विनंती आज मा.जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून करण्यात आली. याप्रसंगी शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, तसेच पिडीत उपस्थित होते.