News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ संलग्नित वरिष्ठ आणि नागपूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १३,१४,१५ तीन दिवसीय उत्साहात महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण, नगरामधून विद्यार्थ्यांची अमृत महोत्सव रॅली आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यात सुरवातीस राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी. गर्ल्स) बटालियन विंगने मानवंदना देण्यात आली. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी, राष्ट्रीय सेवा योजना पथक, कार्यक्रम अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांचे अमूल्य सहकारी लाभले. नंतर मुल येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण समारंभाला उपस्थिती दर्शविली.
याच दिनाचे औचित्य साधून नगर परिषद मुल तर्फे स्वातंत्र्य दीन अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध सहभाग घेऊन स्पर्धेतमधील कर्मवीर महाविद्यालयामधील विजेते ठरलेल्या विध्यार्थी स्पर्धक चित्रकला मधे १) मंगल कोडपे २) सलोनी लेनगुरे ३) गणेश ठाकूर तर निबंध स्पर्धेत १) अविनाश चाहरे २) ट्विंकल उईके ३) छकुली मोहूरले यांना उपविभागीय अधिकारी तहसीलदार डॉ.रवींद्र होळी आणि उपस्थित अनेक मान्यवर यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विजेत्यांचा सत्कार समारंभ १७ऑगस्ट ला कन्नमवार सभागृह येथे करण्यात आला असून असंख्य विध्यार्थीनी सत्कार समारंभ साठी उपस्थित होते.