News 34 chandrapur
राजुरा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्ष झाल्याने आझादी का अमृत महोत्सव निमित्य चुनाळा ग्राम पंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील मराठी व तेलगू माध्यमाच्या २४० विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित राजुरा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रध्वज आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक असून तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या freedom fighter बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत 'हर घर तिरंगा' ही मोहिम राबविण्यात आली असल्याचे सांगितले.
Har ghar tiranga
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख पाहुणे तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, विमाशीचे जिल्हा अध्यक्ष केशवराव ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, सेवानिवृत्त प्राध्यापक शंकर पेद्दूरवार, सरपंच बाळनाथ वडस्कर, पोलीस पाटील रमेश निमकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेंद्र निमकर, ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर कोमटी, ग्राम पंचायत सदस्य राकेश कार्लेकर, संतोषी साळवे, उषा करमनकर, वंदना पिदूरकर, कोमल काटम, संतोषी निमकर, जया निखाडे, सचिन कांबळे, अर्चना आत्राम, दिनकर कोडापे, रवी गायकवाड, आरोग्य सेविका रोहन, मुख्याध्यापक हरीचंद्र विरुटकर, साईबाबा इंदूरवार उपस्थित होते.
Distribution of school bags
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुदर्शन निमकर यांनी हर घर तिरंगा' या उपक्रमाचा मुख्य हेतू लोकांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे असून आजच्या युवा पिढीने देश सेवेचे व्रत स्वीकारून भारत देशाला बळकट करण्याचे आव्हान केले. याच बरोबर चुनाळा येथील युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इंदिरा गांधी सभागृहाच्या वर अद्यावत अभ्यासिका बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. चूनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी ध्वजारोहण करून गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या २४० विदयार्थ्यांना स्कुल बॅग चे वाटप पाहुण्याच्या हस्ते केले. प्रास्ताविक बाळनाथ वडस्कर यांनी केले संचालन गजानन दातरवार यांनी तर उषा करमनकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी पालक व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.