News 34 chandrapur
चंद्रपूर : विदर्भात मागील अनेक दिवसांपासून सततधार पावसामुळे शेतकरी हैरान झाले आहे. दुसरीकडे सरकार त्यांना मदत करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडी सरकारच्या आमदारासह वरोरा - भद्रावती विधानसभेतील महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उभे राहुन अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा नाहीतर खुर्ची खाली करा असा नारा लावत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचे लक्ष वेधले.
Monsoon session
मागील अनेक दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भातील धरणे भरली आहेत. त्यामुळे पाणी शेजारच्या गावांमध्ये येत असल्याने तीन वेळा पुराच्या फटका नागरिकांना बसला आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंतु या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत सरकार सत्तेत दंग असल्याचे दिसून येत आहे. Flood situation त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पाहिजे तशी मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अद्याप देखील अनेक भागातील शेतीचे पंचनामे झाले नाहीत.
Farmers affected by excessive rainfall
चंद्रपूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणत पावसाच्या फटका बसला आहे. जिल्ह्यातील वरोरा - भद्रावती मतदार संघात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांवर व शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे करायचे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. तीन वेळा पूर आल्याने शेतकऱ्यांची पेरलेले पीक देखील वाहून गेले आहे. त्यामुळे कर्जात मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी सापडला आहे. हि बिकट परिस्थिती असून देखील राज्य सरकार गंभीर प्रमाणात उपाय योजना करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा नाहीतर खुर्ची खाली करा असे फलक पकडून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सरकारचे लक्ष वेधले.