News 34 chandrapur
वरोरा - दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वधर्मीय नागरिक एकत्र येत प्रत्येक सण साजरा करत आहे, जिल्ह्यात शांतिप्रिय तालुका म्हणून वरोरा शहराचे नाव प्रचलित आहे.
ज्यावेळी तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक छेरिंग दोरजे हे पदावर असताना वरोरा शहरात गणोशोत्सव दरम्यान पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.
आज छेरिंग दोरजे हे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर आहे.
आज चंद्रपुरात आयजी दोरजे आले असताना परतीच्या वाटेवर वरोरा शहरातील गणेशोत्सवाचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले.
ज्यावेळी वरोरा शहरात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता तेव्हा स्वतः दोरजे यांनी सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळली होती. Ganeshotsav 2022
वरोरा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी गणेश मंडळांना आधीच सर्व बाबीची माहिती देत सर्वांनी शांततेच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे. Chandrapur police
आज 28 ऑगस्टला आयजी छेरिंग दोरजे यांच्या नेतृत्वात वरोरा शहरात रूट मार्च काढण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, सपोनि निलेश चवरे, पीएसआय मित्तरवार व पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.