News34 chandrapur
चंद्रपूर - आजचा विद्यार्थी हाच उद्याच्या देशाचे भविष्य आहे. हे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांच्या वतीने प्रामाणिकपणे केल्या जात आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश देत असतो. हा ज्ञानरूपी प्रकाश विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रत्येक संकटामध्ये मार्गदर्शन करत असतो.
यातुनच विद्यार्थी आणि पर्यायाने देश घडतो. यातही खाजगी शिक्षक हे अत्यंत कमी वेतनात low wages हे काम सातत्याने करत आहे. त्यामुळे खाजगी शिक्षक हे देशसेवा करणारे सेवक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Private tutor
यातुनच विद्यार्थी आणि पर्यायाने देश घडतो. यातही खाजगी शिक्षक हे अत्यंत कमी वेतनात low wages हे काम सातत्याने करत आहे. त्यामुळे खाजगी शिक्षक हे देशसेवा करणारे सेवक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Private tutor
यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कन्नमवार सभागृहात खाजगी शाळांमधील शिक्षिकांच्या स्नेहमीलन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापीका प्रणाली कोल्हेकर, किदवाई शाळेच्या मुख्याध्यापीका नियाज खान, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली आघाडी महिला प्रमुख सविता दंडारे, अल्पसंख्याक महिला शहराध्यक्ष कौसर खान, सायली येरणे, कुणबी समाज महिला प्रमुख आशा देशमुख, बहुजन महिला शहराध्यक्ष विमल काटकर, आदिवासी शहर महिला अध्यक्ष वैशाली मेश्राम आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Young chanda brigade
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आई-वडिलांच्या नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी सतत प्रयत्न करत असतो. मानुस संपत्ती आणि प्रतिष्ठेने कितीही मोठा असला तरी त्यांच्या वैचारिक बृध्दीमत्ता बाढीसाठी त्याला शिक्षणाची गरज पडते. आणि त्याच्या आयुष्यातल्या हाच अपुर्ण रखाना पुर्ण करण्याचे काम करणा-र्या शिक्षकांचा सत्कार करतांना आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मी अनेक अधिका-र्यांशी भेटत असतो या सर्व अधिका-र्यांना त्यांच्या आयुष्यात बदल घडविणा-या एका शिक्षकाचे नाव मुखपाठ असते आणि ते हि याच शिक्षकामुळे आयुष्याला दिशा मिळाली हे आवर्जुन सांगतात हीच शिक्षकांनी विद्याथ्र्यावर केलेल्या संस्काराची पावती आहे. घर परिवार सांभाळुन विद्यार्थी घडवत असलेल्या महिला शिक्षिका या कौतुकास पात्र आहेत. खाजगी शाळांमध्ये काम करत असतांना अत्यंत कमी वेतनात ती ही सेवा करत आहे. त्यांची ही सेवा समाजही कधी विसरणार नाही असे ते यावेळी म्हणाले. female teacher
यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन आपण अशाच सेवाकरी नागरिकांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. नुकताच आपण घंटागाडी कर्मचा-र्यांचा सत्कार केला. पुढे परिचारिका, वेकोलीत काम करणा-र्या महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्याचेही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. केवळ सत्कार करुन माझी जबाबदारी संपली असे नाही. कठीण काळी मला आठवण करा भाऊ म्हणुन तुमच्या पाठीशी उभा राहिल असा शब्द यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिला. या कार्यक्रमात चंद्रपूर येथील जिल्हा क्रिडा संकुलाच्या जलतरण केंद्रात वयाच्या 85 व्या वर्षी 36 प्रकारचे Water Yoga प्रात्याक्षिके करत india book of records मध्ये नोंद करणा-र्या कृष्णाजी नागपुरे यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या माधुरी निवलकर, अस्मिता डोणारकर, प्रेमीला बावणे, अल्का मेश्राम, आशु फुलझेले, वैशाली मेश्राम, वंदना हजारे, शमा काजी, अनिता झाडे, नंदा पंधरे, सोनाली आंबेकर, वैशाली मद्दीवार, माला पेंदाम यांच्यासह खाजगी शाळांमधील शिक्षिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.