News 34 chandrapur
भद्रावती - काही वर्षांपूर्वी एकाने मित्राच्या नातेवाईकांची हत्या केली होती मात्र अनेक वर्षांनी हा वाद पुन्हा उफाळत भद्रावती येथील पिपरबोडी गावात हत्येचा थरार घडला. Chandrapur murderविशेष म्हणजे घटनेच्या दिवशी रविवार 28 ऑगस्टला विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे हे चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सवाचा आढावा घेण्यासाठी आले होते. Chandrapur crime
रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास 35 वर्षीय सूरज चेट्टी या युवकांवर रमेश शेट्टी याने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सूरज चा जागीच मृत्यू झाला. sharp weapon
हत्येआधी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सुरजने काही वर्षांपूर्वी रमेश शेट्टी यांच्या नातेवाईकांची हत्या केली होती, त्याचा वचपा काढण्यासाठी रमेश ने सूरज ची हत्या केली अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.
पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.