News34 chandrapur
चिमूर/वरोरा - चंद्रपूर जिल्ह्यातील चारगाव धरण जवळ आज घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.5 जिवलग मित्र चारगाव धरणातील तुडुंब भरलेले पाणी बघण्यासाठी आले होते, मात्र हे पाणी त्या मित्रांच्या जीवनात काही क्षणात दुःखाचा डोंगर कोसळवणार होती. Chargav Dam
वरोरा व शेगाव मध्ये राहणारे 19 वर्षीय हार्दिक विनायक गुळघाणे, आयुष चिडे, श्वेतम जयस्वाल, 20 वर्षीय मयूर विजय पारखी, 19 वर्षीय आश्रय संजू गोळगोंडे हे 5 मित्र आज चारगाव जवळ निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आले होते.
यावेळी हार्दिक ने मोबाईल काढला व काठावर जात त्याने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला असता अचानक त्याचा पाय घसरला व तो तलावात पडला, हार्दिक तलावात पडल्यावर लगेच आयुष ने त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी मारली.
पण दोघे तलावात बुडाले, मित्रांनी आरडाओरडा केला पण दोघांचा पत्ता काही लागला नाही. Mobile Selfie
जिल्हा प्रशासनाने तात्काळ बचाव पथक पाठविले, अथक प्रयत्नांनंतर अखेर आयुष व हार्दिक चा मृतदेहचं बाहेर काढण्यात आला.
दोघांचे मृतदेह बघताच आयुष व हार्दिक च्या कुटुंबीयांनी व मित्रांनी टाहो फोडला. Last selfie
हसतखेळत मौज मज्जा करण्यासाठी आलेले जिवलग मित्र क्षणात सोडून जातील असं कुणालाही वाटलं नाही, मात्र एका सेल्फी साठी 2 मित्रांना आपला जीव गमावला लागला ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. death of friends
आज जंगल किंवा पूर बघण्याचा मोह नागरिक आवरु शकत नाही, मात्र हा मोह जीवावर बेतू शकतो ही बाब नागरिकांनी सदैव आपल्या मनात ठेवावी.