News34 chandrapur
चंद्रपूर - समाजाला घातक अश्या दोन घटना देशात घडल्या, बिलकीस बानो केस मधील आरोपींची मुक्तता व इंद्र मेघवाल या मुलाला माठातील पाणी प्यायल्याने शिक्षकांच्या मारहाणीत विद्यार्थ्यांचा मृत्यू या दोन्ही घटनेचा चंद्रपुरातील सर्वपक्षीय महिलांनी निषेध केला. Bilkis bano case
गुजरात राज्यातील बहुचर्चित गोध्रा रेल्वे अग्निकांड घटनेनंतर राज्यात हिंसा भडकली होती, त्यावेळी मार्च 2002 मध्ये 5 महिन्याची गर्भवती बिलकीस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, इतकेच नव्हे तर त्यांची 3 वर्षाच्या मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली. Bilkis bano gujarat
त्यावेळी बिलकीस बानो ह्या केवळ 20 वर्षाच्या होत्या, त्या घटनेत बिलकीस बानो यांच्या आई, बहीण असे 14 नातेवाईकांना मारून टाकण्यात आले होते.
मुंबई मध्ये सीबीआय च्या न्यायालयाने 21 जानेवारी 2008 ला 11 आरोपींना बिलकीस बानो अत्याचार व हत्या प्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली मात्र गुजरात सरकारच्या माफी नीती अंतर्गत 15 ऑगस्ट 2022 ला सर्व आरोपींना सोडण्यात आले. Justice
सरकारच्या या निर्णयाला अनेक विरोध झाला होता, दुसऱ्या घटनेत राजस्थान राज्यातील जालोर या गावात इंद्र मेघवाल हा तिसऱ्या वर्गात शिकत होता, 22 जुलै 2022 ला शाळेत असताना इंद्र ला तहान लागल्याने त्याने माठातील पाणी पिले, ते पाणी इंद्र का प्यायला या कारणामुळे शिक्षक छेल सिंग यांनी इंद्र ला अमानुषपणे मारहाण केली, 13 ऑगस्टला इंद्र चा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
या दोन्ही घटना देशाला हादरवणाऱ्या होत्या.
आजही बिलकीस बानो व मेघवाल कुटुंब न्यायासाठी भटकत आहे. Indra meghwal rajasthan
25 ऑगस्ट 2022 ला चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात सर्वपक्षीय महिलांनी निषेध आंदोलन केले.
देशाचा 75 व अमृत महोत्सव एकीकडे नागरिक साजरा करत असताना दुसरीकडे असे समाजाला विघातक घटना सरकार द्वारे होत आहे, ही अतिशय निंदनीय बाब असून दोन्ही प्रकरणी आता न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी महिलांनी केली आहे.
बिलकीस बानो प्रकरणातील आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व इंद्र मेघवाल प्रकरणात आरोपी शिक्षकावर एट्रोसिटी अंतर्गत कारवाई करीत शाळेची मान्यता रद्द करावी, पीडित परिवाराला 50 लाख रुपये मदत म्हणून देण्यात यावे. Indra meghwal death reasons
कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी व पोलीस सुरक्षा देत, सदर प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निषेध आंदोलनात करण्यात आली.
यावेळी डॉ. अभिलाषा गावतुरे, नम्रता ठेमस्कर, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, सुवर्णा सोनूले, लीना गुरनुले, रुपा मांदाडे, सायली देठे आदि उपस्थित होते.