News34 chandrapur
चंद्रपूर - news34@२२ ऑगस्ट - चंद्रपूर शहरात कचरामुक्त व कचरा झेंडी मुक्त अभियान मनपातर्फे राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्यास सातत्याने कार्यरत असतात. शहरातील प्रत्येक घरी कचरा गोळा करण्यास घंटागाडी येते ज्यायोगे सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर कुणीही कचरा टाकु नये. Chandrapur municipal corporation मात्र या सुविधेनंतरही काही नागरीक रस्त्यावर अथवा झेंडीवर कचरा टाकतांना आढळतात. यापुढे कुणीही रस्त्यावर अथवा झेंडीवर कचरा टाकतांना आढळल्यास त्यांना प्रथम नोटीस दिली जाणार आहे त्यानंतरही कचरा टाकतांना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नेहमी कचरा आढळणाऱ्या ठिकाणी तसेच वारंवार सुचना देऊनही कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणी मनपातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे CCTV camera लावुन तपासणी करण्यात येणार आहे. सदर ठिकाणांवर कचरा टाकतांना कुणीही आढळुन आल्यास, कचरा टाकतांना सदर व्यक्तीची छायाचित्रे अथवा व्हिडिओज प्रसारमाध्यमांद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहेत. Do not litter in public places
सदर छायाचित्रे अथवा व्हिडिओज प्रसारमाध्यमांवर प्रकाशित झाल्यास होणारी मानहानी वा नुकसानीसाठी मनपा जबाबदार राहणार नसुन सदरसाठी कोणतीही नुकसानभरपाई मनपातर्फे देण्यात येणार नसल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.