News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हाती येणारे पीक शेतक-यांना गमवावे लागले आहे. तोंडाशी आलेले धान पीक अतिवृष्टीमुळे वाहुन गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तालुक्यातील गांगलवाडी येथील एका तरूण शेतक-याने डोंगरगाव येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.
Farmer suicide काल २२ ला रात्री घडलेली घटना आज उघडकीस आली. मृतक शेतक-याचे नाव संजय जनार्दन चिचघरे (३८) काल रात्री पानठेल्यावरून खर्रा खावुन येतो असे पत्नीला सांगुन गेल्यानंतर आज सकाळ पर्यंत परत न आल्याने त्याची पत्नी आणि नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. Loss of farmers due to heavy rains दरम्यान गांगलवाडी पासुन जवळच असलेल्या डोंगरगाव तलावात कोणत्यातरी इसमाचे प्रेत तरंगत असल्याचे काही गावक-यांना दिसले. काहींना ओळख पटल्याने सदर घटनेची माहिती संजयच्या घरच्यांना देण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून संजय चिंतेत असल्याचे सांगितले जाते. Paddy crop destroyed

यावर्षीचा अतिपावसामुळे मूल तालुक्यातील बहुतांश भागातील धान पीक नष्ट झाले. संजयच्या शेतीची पण धुळधान झाल्याने कर्ज आणि इतर देणी कोठुन द्यायचे ? या विवंचनेत तो सारखा असल्याने अखेर त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा तपास मूल पोलीस करीत आहेत.