News34 chandrapur
वरोरा - 22 ऑगस्टला वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात अर्जुन ट्रेडर्स येथे धाड मारली असता त्याठिकाणी 10 जुगार बहाद्दरांना अटक करीत या कारवाईत एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Police raids22 ऑगस्टला पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांना गोपनीय माहिती मिळाली की बोर्डा येथे काही इसम जुगारावर पैसे लावत आहे. Gamblers
गोपनीय माहितीच्या आधारे नोपाणी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत बोर्डा येथील अर्जुन ट्रेडर्स वर धाड मारली.
त्यावेळी 10 जुगार बहाद्दर हे 52 पत्त्याचा जुगार खेळत पैसे लावत असल्याचे निदर्शनास आले.
playing cards
जुगार खेळणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एकूण 59 हजार 830 रुपये जप्त करण्यात आले. Chandrapur police
पोलिसांनी जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4, 5 अंतर्गत कारवाई करीत गुन्हा नोंद केला. gamester
यामध्ये दीपक उर्फ पप्पू सांबाशिव महाजन, सुभाष नथुजी आसुटकर, प्रकाश शामराव खोब्रागडे, हेमंत शिवसिंग राजपूत, डेव्हिड शंकर बागेसर, मारोती सहुजी गायकवाड, विशाल अशोक आसुटकर, प्रकाश सत्यवान ताजने, प्रकाश नारायण आवारी व चेतन रामराव घुगुल यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर सर्व आरोपींचे चारचाकी व दुचाकी वाहन पकडून एकूण 10 लाख 24 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे सदर आरोपी मधून काही राजकीय पक्षाशी संलग्नित आहे.
