News 34 chandrapur
चिमूर - मानधन काढून देण्याच्या अटीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे गटनीदेशक व निदेशक यांनी चित्रकला निदेशकाला 12 हजार रुपयांची लाच मागितली. Chandrapur newsलाच स्वीकारताना दोघांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.
फिर्यादी हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे तासिका मानधन तत्वावर चित्रकला निदेशक म्हणून कार्यरत आहे. Bribery
फिर्यादी यांनी याबाबत 11 ऑगस्टला चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.
तक्रारीची पडताळणी झाल्यावर गुरुवार 18 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन्ही निदेशकाना रंगेहात अटक केली. Government ITI chimur
सदरची कार्यवाही पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, नरेश ननावरे, संदेश वाघमारे, अमोल सिडाम, रवी कुमार ढेंगळे, मेघा मोहूर्ले व सतीश सिडाम यांनी यशस्वीपणे पार पाडली.
