News 34 chandrapur
चंद्रपूर - शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिल्या पावसाळी अधिवेशनाला गदारोळात सुरुवात झाली, सरकारला महाविकास आघाडी ने चांगलेच धारेवर धरले. Mahavikas aghadi
विधानसभेच्या पायरीवर कांग्रेस, सेना व राष्ट्रवादी कांग्रेसच्या आमदारांनी 50 कोटी रुपयांच्या घोषणा दिल्या, मात्र या गदारोळात चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेच्या विकासासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.
Opposition party
चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागाला शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम आणि छोट्या पुलांसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदर मागणी मान्य करण्यात आली असुन सदर कामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीक विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांसाठी त्यांनी यापूर्वी 20 कोटी रुपयांचा निधी खेचुन आनला आहे. तर ग्रामिण भागाच्या विकासासाठीही त्यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. Maharashtra monsoon session 2022
चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागाला शहराशी जोडणा-या रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली होती. त्यामुळे याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता या मार्गाच्या दुरस्तीसाठी तसेच सदर मार्गावरील छोट्या पुलांच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पीय २०२२ – २३ पुरवणी यादीत ६० कोटी रुपयांची तरतुद करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदर मागणी मान्य करत या कामांसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. Mla kishor jorgewar
या निधीतून चंद्रपूरातील आरवट होत पठाणपुरा - माना - विसापूरहुन नांदगावला जोडणा-या मार्गाचे सिमेंट काॅंक्रिटीकरण करण्यासाठी २१ कोटी रुपये, साखरवाही - येरुर - वांढरी - एमआयडीसी - दाताळा - चंद्रपूर या मार्गासाठी ११ कोटी रुपये, शेणगांव - उसगांव - वढा - धानोरा - पिपरी मार्डा रस्त्यावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी रुपये, ताडाळी - येरुर - पांढरकवडा - धानोरा - भोयगाव - गडचांदुर जिवती मार्गावर सिमेंट नाली आणि गट्टु लावण्यासाठी १ कोटी रुपये, शेणगाव - उसेगाव - धानोरा - पिपरी - मार्डा - शिवनी एमडीआर १२ या मार्गासाठी १ काटी ८० लाख, रुपये खर्च करण्यात येणार असुन यासह ग्रामीण भागातुन शहराला जोडणा-या इतर महत्वांच्या रस्त्यांचे बांधकामही या निधीतुन मंजूर करण्यात आले आहे. यात रस्त्यावरील छोट्या पुलांचे नालीचे व सौदर्यीकरणाची कामेही पुर्ण करण्यात येणार आहे. Development fund