News 34 chandrapur
चंद्रपूर - 15 ऑगस्टला चंद्रपुरातील तुकुम परिसरातून प्रदीप गंगमवार व राजेश झाडे, सरताज हाफिज यांना अज्ञात 4 जणांनी शस्त्रांचा धाक दाखवीत अपहरण केले होते, सुटकेसाठी 3 कोटींची मागणीही करण्यात आली. Kidnapping crimeप्रदीप गंगमवार यांनी आरोपींना 50 लाख देण्याची तयारी दर्शवली पण ते पैसे 16 ऑगस्टला मिळणार असल्याची माहिती दिली.
त्यानुसार आरोपींनी थेट नागपूर गाठले, सिगारेट ची तलब आरोपींना आळणे त्यांनी वाहन मोमीनपुरा येथे थांबविले, सदर संधीचा फायदा घेत राजेश झाडे गाडीतून खाली उतरत वाचवा वाचवा ओरडू लागले, त्यावेळी आरोपी सहित सरताज हाफिज ही पळाला.
त्यानंतर या सर्व अपहरणाच्या मागे सरताज हाफिज हा मास्टरमाइंड असल्याची निष्पन्न झाले.
याबाबत गंगमवार यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. Chandrapur crime
घटनेची गंभीरता बघता दुर्गापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या शोधात विविध पथके तयार केली.
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिकदृष्ट्या सायबर सेलच्या माध्यमातून घुग्गुस येथील अमित सारिढेक हा आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्या आधारे पोलिसांनी अमित ला ताब्यात घेत विचारपूस केली असता आरोपी मोहम्मद सरताज हाफिज बिनबा गेट चंद्रपूर, नागपूर येथील शेख नूर शेख इस्माईल व अजय पुनमलाल गौर हे घुग्गुस येथील द गेट रेस्टरेंट अँड लॉज येथे थांबून असल्याची पोलिसांनी प्राप्त झाली.
पोलिसांनी तात्काळ लॉज वर जात विचारपूस केली असता काही वेळापूर्वी तिन्ही आरोपी चारचाकी वाहन क्रमांक MH48AC8447 ने पसार झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेने sdpo नंदनवार व नाईक यांना याबाबत सूचना दिली असता कोरपना व गडचांदूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी तिन्ही आरोपींना अटक केली.
अटक केल्यावर तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविले त्यानंतर दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
फिर्यादी प्रदीप गंगमवार व राजेश झाडे यांना जुगार खेळण्याचा अतिछंद होता, पोलिसांनी त्यांना पकडू नये यासाठी दोघे विविध ठिकाणी जुगार खेळायला जात होते.
जुगार खेळण्याचा सवयीमुळे दोघांची ओळख सरताज हाफिज यांचेशी झाली, त्याने प्रदीप गंगमवार यांच्याशी मैत्री करीत लाखो रुपये जुगारात हरने जिंकणे आरोपीने बघितल्यावर अपहरणाचा कट रचला होता.
पण हा कट एका सिगरटेच्या तलबाने सर्व कट उधळून लावला, सध्या या प्रकरणातील अजून 2 आरोपी फरार असून चंद्रपूर पोलिसांनी 24 तासांच्या आत 3 आरोपींना अटक करण्यास यश मिळविले.

