News 34 chandrapur
घुग्गुस - घुग्गुस येथील वणी रोडवर असलेल्या रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी सायंकाळी दुचाकी स्लिप होऊन २१ वर्षीय अरबाज शेख या मुलाचा मृत्यू झाला. Railway flyover
या रेल्वे क्रॉसिंग जवळ उडानपुलाचे काम निर्माणाधिन आहे, परंतु या रस्त्यावरील जड वाहतूक आणि वेळोवेळी बंद होणारे रेल्वे फाटक यामुळे एक एक तास ट्रॅफिक जॅम ची समस्यामुळे नागरिक हैराण आहेत. रस्त्याची दुरवस्था व पर्यायी मार्ग नसल्याने जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे. अश्यातच गेल्या तीन दिवसात दोन मृत्यू झाल्याने संतप्त होत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविष सिंग यांनी मृतदेह रस्त्यावर घेऊन सहकाऱ्यांनासह घुग्गुस रेल्वे क्रॉसिंग चौकात रस्त्यावर बसत रास्ता रोको आंदोलन केले. Mns adhikrut
आंदोलनामुळे राजीव रतन चौकात गाड्यांच्या रांगा लागल्याने माजी जिल्हापरिषद सदस्य देवराव भोंगळे यांनी घटनास्थळ गाठत आंदोलकांची व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चर्चा घडवून आणली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित बैठक लावून तोडगा काढण्याचे आदेश सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
यावेळी पर्यायी मार्ग काढण्याची व काम होईपर्यंत रेल्वेवाहतूक बंद करण्याची मागणी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंग यांनी केली आहे.