News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - संपूर्ण देशामध्ये साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने देशभर विविध कार्यक्रम घर घर झेंडा हा उत्सव मोठ्या उत्साहाने शासन स्तरावर पार पडल्या जात असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिवाळीच्या सणासारखा रोषणाई लाऊन साजरा करीत असल्याचे मुल नगरात दिसून येत आहे. Azadi ka amrut mahotsavमुल येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तहसील कार्यालय आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय मुल, नगर परिषद कार्यालय मुल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या इमारतीला तिरंगा रोषणाईने सजविल्या असून मुलवासिय नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. Har ghar tiranga abhiyan
तसेच मागील तीन दिवसापासून सर्वच शासकीय, सार्वजनिक शैक्षणिक संस्था शासकीय, निमशासकीय कार्यालये सोबतच ग्रामीण भागातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असल्याची लगबग अधिकारी व कर्मचारी यांची दिसून येत आहे.