News34 chandrapur
वरोरा/चारगाव - जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक प्रकल्प तुडुंब भरलेले आहे, त्याला बघण्याकरिता नागरिक गर्दी करीत आहे.आज चारगाव धरण बघण्यासाठी वरोरा व शेगाव येथील 19 वर्षीय हार्दिक विनायक गुळघाणे, वरोरा येथील 19 वर्षीय आयुष चिडे, श्वेतम चंद्रकुमार जयस्वाल, 20 वर्षीय मयूर विजय पारखी, आश्रय संजू गोळगोंडे गेले होते. Selfie
धरण बघत असताना हार्दिक हा सेल्फी काढत होता त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरला व तो तलावात पडला, त्याला वाचविण्यासाठी आयुष ने पाण्यात उडी घेतली. Hardik
मात्र आयुष ही पाण्यात बुडाला, दोन्ही मित्र पाण्यात बुडत असताना मित्रांनी दोघांना वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. Breaking News
स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांचा काही पत्ता लागला नाही. Best friends drowned
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बचाव पथकाला चारगाव येथे पाठविले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले असून दोघांचा शोध घेणे सुरू आहे. Rescue
शेगाव पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आहे.