News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील सर्वात मोठा गावं म्हणून सामाजिक,राजकीय दृष्ट्या परिचित असलेल्या राजोली ते पेटगावं महामार्ग या मुख्यरस्त्याचे रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. सिमेंट काँक्रिट रुंदीकरणाचे काम केल्याने रोडची उंचीही वाढलेली आहे. power line
या मार्गावरील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली असून याच मार्गावर राजोली येथील असंख्य शेतकऱ्यांची शेती सुद्धा रोडलगत आहे. त्यामुळे यारस्त्यवरून सकाळ पासून तर संध्याकाळ प्रसंगी रात्री देखील ट्रॅक्टर, लेबर नागरिक यांची एकसारखी वाहतुकीची वर्दळ सुरु असते. आणि मुख्यत्वे याच रस्त्यावरील विद्युत वाहिनी मात्र तेव्हाच स्थानांतरीत करायला पाहिजे होते.परंतु ते करण्यात आलेले नाही. आणि याच विद्युत वाहिनी वरुन असंख्य नागरिकांचे विद्युत कनेक्शन जोडण्यात आले असल्याने विद्युत पुरवठा सारखा सुरु असतो. Chances of a major accident
त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या चारचाकी, दुचाकी, सायकल अशा वाहनांना विद्युत वाहिनी अडत आहे. करीता भविष्यात खुल्या ठेवण्यात आलेल्या विद्युत वाहिनिमुळे फार मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. करीता भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी खुल्या ठेवण्यात आलेल्या विद्युत वाहिन्या त्वरित स्थानांतरीत करण्यात याव्या अशी मागणी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या व जनतेच्या वतीने मुल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काँग्रेस नेते घनश्याम येनुरकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे मुल येथील उपकार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग चौरसिया साहेब यांचेकडे मागणी केली आहे.