News 34 chandrapur
मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आपल्या संभाषणाची सुरुवात हॅलो ने नाही तर वंदे मातरम ने करतील असे आदेश दिले. Jitendra awhadमात्र मुनगंटीवार यांच्या या निर्णयाचा हळूहळू विरोध दर्शविणे सुरू झाले आहे. Say Vande matram
माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवार यांच्या आदेशावर आक्षेप घेतला, अशी जोर जबरदस्ती करू नका. हा देश स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, श्वास कुठून कसा घ्यावा तो पण तुम्हीच ठरवणार का? इतकाही भारताचा श्वास गळा घोटण्याचा प्रकार करू नका. मला हॅलोच म्हणायचं आहे. मला जय भीम म्हणायचं आहे. आता ते जबरदस्ती आमच्या कडून म्हणवून पण घेणार की जबरदस्ती जेलमध्ये टाकणार. पोलिसांकडून केस टाकणार कायदा मोडला म्हणून 353?”, असंही आव्हाड म्हणालेत. Azadi ka amrut mahotsav
“इथे मिठाला लागलेल्या करा वरती लाखो लोक रस्त्यावर आले असा हा भारत आहे, त्याची पण आठवण ठेवा. हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांनी 1942 मधे छोडो भारतचा नारा दिला आणि हजारो लोक रस्त्यावर झोपले. गोळ्या खाल्ल्या. रक्त सांडलं. पण मागे हटले नाहीत. आपला जी उद्देश आहे तो सोडला नाही”, असंही आव्हाडांनी म्हटलंय. Hello
भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराने भारतीय संस्कृती सुरू होते. या संस्करांमधे नमस्कार आहे. कित्येक लोक जयभीम म्हणतात, कित्येक लोक जय हिंद म्हणतात. साधारण पोलिस अधिकारी बोलताना जय हिंद शब्दाने बोलणं सुरू करतात. कोणी सस्रियाकाल म्हणेल कोणी जय भीम म्हणेल. कोणी नमस्कार म्हणेल किंवा कोणी वंदे मातरम् म्हणेल. त्यातून येणाऱ्या भावना महत्वाच्या आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवर यांच्या निर्णयावर टीका केली आहे. Sudhir mungantiwar
“उगाचच भारतीय राज्य घटनेने दिलेले स्वातंत्र्य तुमच्या हाताने गळा घोटू नका. कोणालाही ते आवडत नाही. कोणी काय खावं कोणी काय घालावं आता कोणी काय बोलावं हे पण तुम्ही ठरवणार का?”, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय.