News 34 chandrapur
बल्लारपूर - 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र आजही अनेक नागरिक गुलामीला बळी पडत आहे, पण यातील काही गुलामीला झुगारून आवाज उचलण्याचे काम करीत आहे. India@75बल्लारपूर निवासी व राज्य परिवहन महामंडळातील राजुरा ST डेपो मध्ये TC या पदावर कार्यरत 30 वर्षीय भगवान अशोक यादव ने अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली.
सदर घटना स्वतंत्र दिनाच्या रात्री घडली, भगवान ची पत्नी रक्षाबंधनाकरीता बाहेर गावी गेली होती.
रात्री मित्रांसोबत बोलणं झाल्यावर आईने जेवायला वाढले होते पण भगवान च्या मनात काही वेगळाच विचार होता. Msrtc rajura depo
मी रात्री जेवतो तू झोप असे शेवटचे उद्गार भगवान ने काढले, रात्री सर्व झोपी गेले, स्मशान शांतता पसरली त्याचा फायदा घेत भगवान ने गळफास घेत आत्महत्या केली. Msrtc employee suicide
भगवान बल्लारपूर शहरातील कन्नमवार वार्डात राहत होता, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व भगवान च्या मृतदेहाला शव विच्छेदन करीता पाठविण्यात आले.
भगवान च्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट आढळून आले त्यामध्ये एसटी डेपो मधील 2 अधिकारी वारंवार मला पैश्याची मागणी करतात, पैसे न दिल्यास छळ करतात त्या दोघांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. Suicide note
पोलिसांनी सुसाईड नोट जप्त करीत पुढील तपास सुरू केला आहे.