News 34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यांतील मौजा नवेगाव भूजल येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून दिनांक ९/८/२०२२ सायंकाळी ५ वाजता नवेगाव भुजला येते माझं गाव माझी शाखा अभीमान अंतर्गत युवक काँग्रेस शाखा नवेगाव भुजलाचे उद्घाटन कूनाल दादा राऊत प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व शंतनू धोटे अध्यक्ष जिल्हा चंद्रपूर याचं हस्ते पार पडले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संतोष भाऊ चावरे ग्राम पंचायत सदस्य रविकांत पाटील आरेकर माजी सरपंच दिगाबर भाकरे अध्यक्ष शाळा समिती, कार्यक्रमाचे आयोजक चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव माजी सरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुमित पाटील आरेकर, गावातील जेष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते तथा युवक काँग्रेस कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक काँग्रेस अध्यक्ष पंकज पाल, उपाध्यक्ष वीकास सदोकर, महासचीव सुलभ मडावी, सचीव आशीष मूनघटीवार यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

