News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील अनेक गावात यावर्षी १६ घटना वाघाच्या हल्याच्या घडल्या असून दिनांक १७ /८/२०२२ रोजी मौजा करवंन येथील भाऊराव गेडाम वय ५५ वर्षे हा गुराखी गावातील गुरे चारण्याकरीता करवन गावापासून सात किलोमीटर अंतरावर दाट जंगलात गेला असता जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले.
Tiger attack chandrapur
Tiger attack chandrapur
सदर घटना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत होताच वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी आपले वन कर्मचारी घेऊन तिथे दाखल झाले. तपासणी केली असता गुराखी चालू शकत नसलेल्या अवस्थेत असल्याने त्याला अक्षरशः कावड बांधून आणण्यात आले. व मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. Human Wildlife Conflict
सदर घटना मारोडा बीटातील कक्ष क्रमांक ७७३ मधली असून या परिसरात नेहमीच वाघाच्या घटना घडत असल्यामुळे या परिसरातील जंगलात अती खोल दूरवर गुरे चारण्यासाठी गुराख्यानी किंवा इतर शेतकरी शेतमजुरी जाऊ नये अशा सूचना वनविभाग अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या असून जंगल परिसरातील नागरिकांना विनंती सुद्धा केली असल्याचे सांगण्यात आले. असे असताना नागरिकानी इतक्या दाट जंगलात गुरे चरायला घेऊन जाणे योग्य नाही. वाघापासून नागरिकांनी देखील सावध राहावे आणि वनविभागाला सहकार्य करावे असे मत येथील वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली आहे.