News 34 chandrapur
घुग्गूस - ताडाळी गावातील काही नागरिक अस्थिविसर्जनासाठी घुग्गुस येथील वढा परिसरातील नदीच्या संगमावर आले होते.मात्र अस्थिविसर्जन करते वेळी वर्धा नदीत एका युवकाचा तोल गेला व तो इसम नदीत बुडाला त्याचवेळी ताडाळी निवासी 30 वर्षीय विशाल सुरेश चौधरी याने तात्काळ नदीत उडी घेत त्या इसमाला वाचविले पण त्याला वाचवित असताना विशाल स्वतः नदीत बुडाला. One died after drowning in the river
सोबत आलेल्या नागरिकांनी विशाल चा शोध घेतला असता त्याचा काही पत्ता लागला नाही, नागरिकांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.
चंद्रपूर जिल्हा पोलिसांचे पथक तात्काळ वढा येथे पोहचले.
विशाल च्या मृत्यूने ताडाळी गावात शोककळा पसरली आहे.
बचाव पथकातील बोट चालक अशोक गरगेलवार, मंगेश मत्ते, वामन नक्षीने, उमेश बनकर, अतुल चहांदे, सुजित मोगरे, गिरीश मरापे यांनी शोध मोहीम राबवली.