News 34 chandrapur
चंद्रपूर - फायनान्स कम्पणीच्या साहाय्याने गोंडपीपरी येथील एकनाथ जेंगठे यांनी शेतीच्या कामाकरिता ट्रॅक्टर घेतला होता, सदर ट्रॅक्टर घेण्यासाठी जेंगठे यांनी ओळखीच्या लोकांकडून कर्ज घेतले होते.मात्र ते कर्ज व ट्रॅक्टर ची installment भरण्यासाठी जेंगठे यांची फसवणूक झाली.
10 इंस्टॉलमेंट पैकी 7 इंस्टॉलमेंट नियमितपणे भरणा केला मात्र आठवी इंस्टॉलमेंट थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर जप्त केला.
जेंगठे यांनी आठवी इंस्टॉलमेंट 1 लाख 27 हजारांचा भरणा केल्यावर ट्रॅक्टर परत आणला.
त्यावेळी सदर एकूण फायनान्स 1 लाख 20 हजार रुपये भरणे बाकी होते.
कर्जाचे पैसे परत घेण्यासाठी नागरिकांनी जेंगठे यांच्या घरी गराडा घातला, कर्जाच्या विळख्यात सापडलेले जेंगठे यांनी सदर ट्रॅक्टर विकण्याचा निर्णय घेत त्या पैशातून कर्जदारांचे पैसे व फायनान्स कंपनीच्या रकमेचा भरणा करणार होते.
चंद्रपुरातील शेख हारुन शेख कुदृस यांनी जेंगठे यांच्या ट्रॅक्टरचा 4 लाख रुपयात सौदा केला मात्र 1 लाख व 1 लाख 20 हजारांचा धनादेश निमगडे व मोरे यांच्या नावावर वळता केला मात्र सदर दोन्ही चेक बाऊन्स झाले.
उर्वरित 1 लाख 80 हजार रुपये शेख हारून यांनी जेंगठे यांना दिले नाही, चोला मंडलम कंपनीचे मॅनेजर असीम बॅनर्जी यांनी ट्रॅक्टर ची थकीत रक्कम 1 लाख 20 हजार वरून 1 लाख 66 हजार केली.
यावर शेख हारून यांचेशी सम्पर्क साधला असता सोमवारी जेंगठे यांचा पूर्ण हिशोब करणार असल्याची माहिती दिली, जेंगठे यांनी मला समोर येऊन भेटायला हवं जेणेकरून सविस्तर चर्चा यावर होऊ शकते अशी प्रतिक्रिया हारून यांनी दिली.
चोला मंडलम चे बॅनर्जी यांच्यासोबत सम्पर्क साधला असता त्यांचा मोबाईल क्रमांक आऊट ऑफ कव्हरेज असल्याने सम्पर्क होऊ शकला नाही.
जेंगठे यांनी याबाबत गोंडपीपरी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जेंगठे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.