News 34 chandrapur (रमेश निषाद)
कोठारी:- बल्लारशाह कडून इटोलीकडे मजूर महिलांना घेऊन जात असताना कोठारी नजीक येनबोडी फाट्यावर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. त्यात सुमो पलटी झाली व चालकसह सात महिला जखमी झाल्या आहेत. Road accident
बल्लारपूर कडून इटोली कडे टाटा सुमो क्र.एम एच ३२ इ क्यू ०३६९ शेतात निंदनिकरिता मजूर महिलांना घेऊन जात असताना.एनबोडी जवळ येताच पुढुन येणाऱ्या वाहनाला साइड देतांना चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटले. भरधाव जाणारे वाहन अचानक विलास तेलतुंबडे यांचे शेताकडे जात पलटी झाले.त्यात चालक व सात महिला गंभीर जखमी झाल्या. सदर घटना सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. यात गंभीर जखमी मध्ये पुनम कमलाकर बोबाटे, वय ४०, ललीता बबन चौधरी वय ४०, कांचन संघदीप कुंभारे, वय ३९, गाडी मालकीन निशा शिवकुमार कैथवास वय ५०, वाहन चालक सुरेश बहुरिया, तर किरकोळ जखमी मध्ये निलीमा विनोद वाढई वय ३५, वर्षा संतोष नन्नवरे वय ३४, व अर्चना नरेश हनुवते वय ३० आदींचा समावेश आहे. अपघाताची माहिती होताच येनबोडी येथील नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले व बल्लारपूर पोलिसांना माहिती दिली. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी वाहनचालक दारूच्या नशेत होता अशी तक्रार हनुवते यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे, वाहनचालकच्या हलगर्जीपणा मुळे हा अपघात घडला. High speed vehicle
जखमींना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले असुन पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.जखमी पैकी काही महिलाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते.