News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही: नगरपंचायत क्षेत्रातील शीट क्रमांक ६ मधील बाजार चौकातील गुजरीच्या राखीव जागेवर अतिक्रमण करुन त्यावर पक्के बांधकाम केले असल्याने नगरपंचायत कडून अतिक्रमण काढण्यात आले.
Encroachment demolished
Encroachment demolished
सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही नगरपंचायत क्षेत्रातील शीट क्रमांक ६ मधील गुजरीच्या राखीव जागेवर भूषन मनोहर मेरुगवार रा. सिंदेवाही यांनी अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले. भूषन मेरुगवार यांची भाजीपाला विक्री ची दुकान अतिक्रमण केलेल्या ठिकाणी होती. नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही यांच्याकडून भूषन मेरुगवार यांना अतिक्रमण करुन त्या ठिकाणी केलेले पक्के बांधकाम काढण्याबाबत वारंवार नोटीस देऊनही त्यांनी केलेला बांधकाम काढले नाही. त्यामुळे नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही यांनी दिनांक ४ ऑगस्ट ला दिलेल्या नोटीस नुसार शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट ला सकाळी केलेले भाजीपाला विक्रेते भुषण मेरुगवार याचे दुकानाचे अतिक्रमण नगरपंचायतकडून जेसीबी JCB च्या सहाय्याने काढण्यात आले. यावेळी सिंदेवाही-लोनवाही च्या प्रभारी मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, सिंदेवाही पोलीस विभाग तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.
केलेली कारवाई नियमानुसारच👇🏼
याबाबत सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत च्या प्रभारी मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांना विचारना केली असता त्यांनी सांगितले की ही कारवाई नियमात राहूनच केली आहे. सदरचे अतिक्रमण धारक हे नगरपंचायत च्या परवानगी विना पक्के बांधकाम केले. केलेला बांधकाम काढण्याबाबत त्यांना अनेकदा नोटीस देऊन सुद्धा त्यांनी अतिक्रमण काढले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. Action as per rules
अतिक्रमण धारकाने व्यक्त केला रोष- 👇🏼
ही कारवाई फक्त माझ्यावरच का? माझ्या दुकानाच्या बाजूला त्या दूकानावर कारवाई का नाही ? नगरपंचायत क्षेत्रात मी एकट्याने अतिक्रमण केला व बांधकाम केला काय? मी गरीब आहे म्हणून कारवाई ? अशा अनेक शब्दात कारवाई दरम्यान अतिक्रमण धारकाने रोष व्यक्त केला. Nagar panchayat