News 34 chandrapur
चंद्रपूर : राज्यस्तरावर प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार जोपासणाऱ्या व शिव - फुले - शाहू - आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शिवसेना व संभाजी ब्रिगेड या पक्षांनी युती केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून जल्लोष केला आहे.
Shiv Sena-Sambhaji Brigade alliance
मागील पंचवीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड ही एक आक्रमक सामाजिक संघटना राज्यामध्ये कार्यरत आहे. २०१६ मध्ये राजसत्तेचे धोरण स्वीकारत संभाजी ब्रिगेडची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली. या पक्षाच्या गावोगाव शाखा आहेत, गावागावांत कार्यकर्ते आहेत. बुद्धीप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारित शेतकऱ्यांचे - सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या पक्षाची वाटचाल सुरू आहे. लढवय्ये कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडची ओळख आहे. संभाजी ब्रिगेड व शिवसेनेची युती झाल्यामुळे खऱ्या अर्थाने शिव फुले शाहू आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी ही युती राजसत्ता म्हणून काम करणार आहे.
Shivsena udhav thackeray
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी एकत्र येत युती करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यां मध्ये अतिशय आनंद झाला आहे. चंद्रपूर येथील संभाजी ब्रिगेड च्या जिल्हा कार्यालय मध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत पेढे भरवुन जल्लोष करण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, राज्यनेते डॉ दिलीप चौधरी, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, विभागीय कार्याध्यक्ष रविभाऊ आसुटकर, जिल्हा सचिव गजानन नागपूरे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष भोयर, संघटक मोरेश्वर चटप, कार्यालयीन सचिव गुमदेव थेरे, संजय बोटरे, मनीष काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड - शिवसेना युती बद्दल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या युतीचे ग्रामीण भागातहि स्वागत होत आहे.
Political party sambhaji brigade
शेणगाव येथे कार्यकर्त्याचा फटाके फोडून जल्लोष
चंद्रपूर तालुक्यातील शेण गाव या गावांत गेल्या 7 वर्षापासून संभाजी ब्रिगेड ची सत्ता आहे, येथे नुकताच सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी ने ग्राम विकास महोत्सव संपन्न झाला होता. येथेही राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथे कार्यकर्ताने फटाके फोडून आणी मिठाई वाटून संभाजी ब्रिगेड- शिवसेना युतीचा जल्लोष करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख दिपक खारकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य राजेश कांबळे, शाखाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद मासिरकर, मंगेश चटकी, अमोल बोबडे, अमोल वैद्य, प्रवीण ढाकणे, ओमेश्वर मेसेकर, ज्ञानेश्वर चौधरी, राकेश भगत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.