News34 chandrapur
चंद्रपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज्यात सत्तांतर झाले असले तरी हे सत्तांतर लोकांना फार काही पटलेले नाही. त्यामुळे ही बाब घेऊन आपण लोकांपुढे गेले पाहिजे.
पक्ष संघटना बळकट करताना जनसामान्यांच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत जनमानसात वातावरण निर्माण करावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्षांनी सर्व उपस्थितांना केली.
पक्ष संघटना बळकट करताना जनसामान्यांच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत जनमानसात वातावरण निर्माण करावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्षांनी सर्व उपस्थितांना केली.
पुढे ते म्हणाले की, काही जण फक्त उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम चालू ठेवावे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिली तर विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या आरोपाखाली बदनाम केले जात आहे. आपल्याला ED, CBI या १२ व्या खेळाडूसोबतही लढायचे आहे. त्यामुळे काम करताना विचलित होऊन चालणार नाही. त्यासाठी आपले संघटन मजबूत करा, असे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्षांनी केले.
सदस्यत्व नोंदणीची मोहीम सुरू करा आणि आपली ताकद वाढवा. या ताकदीच्या जोरावर आपण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितपणे फडकवू, असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
Ncp rular
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,यांनी प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यातील पक्षाच्या वाटचालीचा विस्तृत अहवाल मांडला. जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत ६ पैकी एक जिवती नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष, गोंडपिपरीत २ सदस्य, गडचांदूर नगर परिषदेत ४ सदस्यांसह उपाध्यक्ष, निवडून आणत,जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला निकाल मिळवून बळकट करण्याचा अहोरात्र प्रयत्न करीत असल्याबाबत माहिती देत आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद,नगर पंचायत निवडणुकीच्या तयारीचा दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वॉर्ड निहाय आणि ग्रामीण भागात पंचायत समिती निहाय बैठका,गाव पातळीवर चावडी बैठका, विविध आंदोलन, पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून चिमूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन, इत्यादी पक्ष कार्याची माहिती दिली.
आणि या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याची माहिती मा.जयंत पाटीलांना दिली यावेळी मंचावर माजी आमदार मोरेश्वर टेंभूर्डे, डॉ.अशोक जिवतोडे, बाबासाहेब वासाडे, शोभाताई पोटदुखे,हिराचंद बोरकुटे, नितीन भटारकर, महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, युवती जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, तसेच जिल्ह्यातील सर्व विधानसभा अध्यक्ष व सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.