News34 chandrapur
वरोरा - गेल्या चार-पाच महिन्यापासून छुप्या पद्धतीने सट्टापट्टीचा व्यवसाय चालविणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला, सदर घटना माढेळी येथील असून आठवडी बाजारातच आरोपीला अटक करण्यात आली. Chandrapur crime
छुप्या पद्धतीने सट्टापट्टीचा व्यवसाय करणारा आरोपी राजू रामचंद्र वाघमारे(४५)रा. माढेळी हा काही दिवसांपासून अवैधपणे व्यवसाय करीत होता, या जुगाराच्या व्यवसायकरिता तो अनेक ठिकाणे बदलायचा हे पोलिसांना माहीत होते आणि पोलीस त्याच्या मागावर होते, kalyan-matka परंतु आरोपी एकदाही पकडल्या गेला नाही, सदर आरोपी हा छुप्या मार्गाने अगदी वर्दळीच्या मार्गावर असलेल्या एका सलूनच्या बाजूला लागून असलेल्या मुत्री घराच्या ठिकानी सट्टापट्टीचा जुगार चालवायचा,माहितीच्या आधारे काल दि.२९/०८/२०२२रोजी ठीक ६:००वाजता आठवडी बाजारातच त्याला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. Maharashtra Gambling Act
आरोपी कडून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याला आला असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (A) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष्य निपोनी (IPS)यांच्या आदेशानुसार व ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात माढेळी बिटचे हेड कॉन्स्टेबल ईश्वर गायकवाड पो. शि.ज्ञानेश्वर मडावी यांनी कारवाई केली.