News34 chandrapur
चंद्रपूर - कोळसा चोरी हा प्रकार लहान ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे, सध्या आपल्या लक्षात कोळशाच्या मोठ्या चोऱ्या आहे, मात्र छोट्या प्रमाणात होणाऱ्या चोऱ्या संबंधित विभागाला मोठी हानी पोहचवीत आहे.सध्या चंद्रपूर WCL मध्ये सिक्युरिटी इंचार्ज नसल्याने चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत होत्या, मात्र आता वेकोलीला नवा इंचार्ज मिळाला त्यांनी सतत वेकोली क्षेत्रात पेट्रोलिंग सुरू केली मात्र आज 25 ऑगस्टला सुरक्षा रक्षकांच्या दुर्लक्षितपणामुळे एका युवकाचा बळी गेला. Security guards
चंद्रपुरातील लालपेठ ते नांदगाव या रोडवरील कोळसा चोरी करणाऱ्यासाठी जंगल छावणी म्हणून एक भाग आहे, या मार्गावर मागील अनेक वर्षांपासून कोळसा चोरी केल्या जात आहे.
सदर कोळसा चोरी मागे परिसरातील काही म्होरके आहे, त्यांचं नाव कोळसा चोरी साठी प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी बल्ली नामक युवक त्या ट्रक वर चढला, चालत्या ट्रक मधून कोळसा काढत असताना त्या युवकाचा तोल गेल्याने तो खाली पडला. Coal theft
बल्ली हा ट्रक च्या मागच्या चाकात सापडल्याने तो अक्षरशः चेंदामेंदा झाला, प्रकरण वाढू नये यासाठी त्याचा मृतदेह तात्काळ घरी नेण्यात आला.
कोळसा चोर करणारे माफिया त्याच्या घरी पोहचत कुटुंबाला आर्थिक मदत केली.
पोलीस स्टेशनला कुणी तक्रार न दिल्याने या प्रकरणाची कुठेही नोंद नाही.
या बाबत वेकोली सोबत सम्पर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र कुणी काही बोलायला तयार नाही. Coal Mafia
वेकोलीच्या सुरक्षा रक्षकांच्या चुकीमुळे आज एकाचा जीव गेल्याने परिसरात चांगलाच असंतोष पसरला आहे.
ज्याठिकाणी ही घटना घडली तो मार्ग व परिसर wcl च्या हद्दीत येतो, व घडलेल्या घटनेबाबत खुद्द वेकोली ने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला हवी होती, वृत्त लिहेपर्यंत वेकोलीने पोलिसात तक्रार दिली नव्हती.
