News 34 chandrapur
चंद्रपूर - दिनांक 31 जुलै 2022 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपुर चे घुटकाळा वॉर्ड येथील कार्यालयात ग्रेपलिंग राज्यस्तरीय स्पर्धे मध्ये चंद्रपूर मधील विजयी खेळाडू यांचा सत्कार व पक्ष प्रवेश तथा पद वितरण असे एकत्र कार्यक्रम आम आदमी पार्टी चंद्रपूर महिला अध्यक्ष ऍड. सुनीता ताई पाटील यांचा नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांचा अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडण्यात आला.दिनांक 15-17 जुलै ला आयोजित 10 वी राज्यस्तरीय ग्रेपलिंग अजिंक्यपद स्पर्धा, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वजन गट मध्ये विविध पदक पटकावीत चंद्रपूर चे नाव केले आहे. यामध्ये 71 kg मध्ये मुकेश कुमार पांडे ने 2 सुवर्ण पदक, 58 kg मध्ये विजय कुमार गिरी ने सिल्व्हर पदक हासिल केले. मुली मधून कु निर्जला अनिल कराडे ने 2 रजत पदक, 49 kg मध्ये कु आर्य मधुकर शेंडे ने रजत पदक पटकाविले.
18 ते 21 ऑगस्ट 2022 रोजी हरियाणा येथे आयोजित राष्ट्रीय प्रतियोगीता मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अश्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन प्रोत्साहित केले.
तर दुसऱ्या कार्यक्रमात घुटकाळा वॉर्ड मधील कार्यालयात 100 महिलांनी पक्ष प्रवेश केले व त्यांना पद वितरण केले. या सम्पूर्ण कार्यक्रम मध्ये जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, सचिव दोरखंडे, शहर सचिव राजु कुडे, युवा नेतृत्व संतोष बोपचे, आरती आगलावे महीला सचीव, जासमीन शेख महीला उपाध्यक्ष, रुपा ताई कातकर महीला उपाध्यक्ष, शबनम शेख महीला कार्यकारी अध्यक्ष, सिकंदर सागोरे, सुनील सदभैया, इत्यादी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.