News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर विभागातील नांदगाव वेकोली मध्ये मागील 3 वर्षांपासून वेकोली कॉलोनी मधील नागरिक पिण्याच्या पाण्याच्या समस्येने ग्रस्त आहे.अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा वेकोली प्रबंधन नागरिकांच्या समस्येवर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी लावला. Wcl chandrapur
पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नालीतून आलेली आहे, ती पाईपलाईन मागील अनेक वर्षांपासून फुटलेल्या अवस्थेत आहे, ती पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याच्या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करतात त्यावर फुटलेल्या पाईपलाईन ला वेकोली द्वारे रबर लावण्यात येत आहे.
पण त्या समस्येचा तोडगा काही काढला जात नाही.
कॉलॉनीत अनेक समस्या आहे मात्र मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची असून त्याकडे वेकोली द्वारे दुर्लक्ष केल्या जात आहे. Wcl water crisis
पाण्याच्या समस्येवर वेकोलीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही.
विशेष म्हणजे जमिनीच्याया भूगर्भातील लाखो लिटर पाणी वेकोली बाहेर फेकते पण ते पाणी नागरिकांना पिण्यासाठी वेकोली देऊ शकत नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागेल.