News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील मुल हे एकमेव शहर गणेशोत्सवासाठी विदर्भातील प्रसिद्ध असे ठिकाण असून मोठ्या जल्लोषात भक्ती भावाने हर्ष उत्साहात येथे गणेश उत्सव व विसर्जन थाटा माटात करण्याची परंपरा आजही कायम आहे. Ganeshotsav 2022
श्री.गणेश उत्सवात अनेक सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होऊन गणेशाची स्थापना करुन प्रत्येक मंडळ रोषणाई सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम राबवित असतात. एवढेच नव्हेतर गणेश विसर्जनाच्या दिवशी धार्मिक,पौराणिक,सामाजिक, शैक्षणिक, रामायण, महाभारत,कृष्णलीला, याशिवाय आपल्या देशात घडत असलेल्या करंट घटना प्रत्यक्ष मुर्त्यांच्या रुपात साकारून तालुक्यातील गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेणारे देखावे सुद्धा सादर करीत असतात. आणि हे देखावे पाहण्यासाठी मुल, सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा येथील भक्तगण नागरिक यांची मोठी गर्दी होत असते. तसेच नगरात घरगुती श्री गणेशाची स्थापना मोठ्या प्रमाणात होत असते. एक दिवस,तीन दिवस,पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस, आणि अनंत चतुर्थी पर्यंत अशा स्वरूपात गणेश उत्सव साजरा होत असतो.

गणेश उत्सवामध्ये काही अनुचित घटना घडू नये, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मुल येथील पोलिस प्रशासन, तालुका प्रशासन,नगर प्रशासन दरवर्षीच लक्ष ठेऊन,गस्त घालून आपले कर्तव्य देखील पार पाडत असतात. हे देखील उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्य म्हणून मुल पोलीस यांचा पुढाकार राहिला आहे यात शंका नाही. मागील वर्षी सुद्धा पोलीस निरीक्षक सतिष सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सव शांततेत पार पडला. यावर्षी देखील मूल नगर प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने गणेश विसर्जन स्थली तलावावर संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार आहे. SP chandrapur
याकरिता प्रत्यक्ष चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे हे मुल येथे येऊन आपल्या नेतृत्वाखाली मुल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे , येथील पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत उपनिरीक्षक राठोड यांच्या उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मूल नगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता अधिकारी अभय चेपूरवार यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने संपूर्ण स्वच्छता ज्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन केला जातो तिथे बॅरिकेट बांधून तेथील संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार आहे. मुर्त्यांच्या झाकी साठी मूल हे प्रसिद्ध असून येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्याकरता येतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने आधीच नियोजन केल्या जात असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांच्या पाहणीतून दिसून येत आहे.