News34 chandrapur
चंद्रपूर/घुग्गूस - 26 ऑगस्टला घुग्गूस शहरातील अमराई वार्डात अख्खं घर जमिनीच्याया आत दफन झालं, या घटनेचे अनेक नागरिक प्रत्यक्षदर्शी आहे. Horrific incidentघुग्गूस येथे इंग्रज काळापासून कोळसा खाणं आहे, त्यांनतर सदर खाणीतून कोळसा उत्खनन सुरू होते मात्र काही वर्षात ही कोळसा खाण बंद पडली.
अमराई वार्डात राहणारे गजानन मडावी 26 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास कुटुंबासाहित घरी होते, अचानक काही वेळात घराला लहान भगदाड पडले, काहीतरी भयानक होणार याचा सुगावा मडावी यांना लागला त्यांनी लगेच कुटुंबासाहित बाहेर धाव घेतली व क्षणार्धात संपूर्ण घर जमिनीच्या 70 ते 100 फूट आत गेलं. Landslides in chandrapur
या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक घर खाली करीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
वेकोली, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी अमराई वार्डात दाखल झाले. Western coalfields limited
खाणीतून कोळसा काढल्यावर त्यामध्ये वेकोली स्वर रेती भरण्यात येते जेणेकरून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मात्र आजच्या घडीला असं एकाच वेळी घडते. Coal india
खाणीच्या आत खरंच रेती पाहिजे त्या प्रमाणात टाकण्यात येते काय? हा देखील मोठा प्रश्न आहे.
वेकोलीच्या चुकीच्या धोरणामुळे एका परिवारावर बेघर होण्याची वेळ आली आहे, या प्रकरणी जितकं वेकोली प्रशासन जबाबदार आहे तितके नागरिक सुद्धा आहे.
खाण परिसरात स्वतः घरे बांधून दुर्घटनेला आमंत्रण देण्याचं काम नागरिकांनी स्वतः केलं.
आता खरंच खाणं परिसरातील घरे सुरक्षित आहे का? यावर वेकोली प्रशासनाने तात्काळ विचार करून योग्य निर्णय घ्यावा.
