News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सार्वजनीक स्थळी कचरा करणाऱ्या व्यक्ती,दुकानांवर कारवाई करण्यात आली असुन संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद देण्यात आली. Chandrapur municipal corporation मनपा स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकला जातो. अश्यांसाठी मनपातर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे. Public places
तसेच प्लास्टिक संदर्भात हार फुले विक्रेते यांच्याकडील प्लास्टिकचे आवरण असलेले बुके व खर्रा विक्री केंद्रांवरील पन्नी देखील जप्त करण्यात आले असुन प्लास्टिकचा वापर न करण्याची ताकीद त्यांना देण्यात आली. सदर कारवाईस मनपा वैद्यकीय अधिकारी स्वच्छता अमोल शेळके व उपद्रव शोध पथकाचे भूपेश गोठे, प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार, महेंद्र हजारे उपस्थित होते.