News 34 chandrapur
चंद्रपूर :-अपहरणाच्या बनावट स्टोरीने चंद्रपुरात खळबळ उडाली. चंद्रपूर शहरालगतच्या पडोली येथील घटनेने पोलीस - पालक देखील बुचकळ्यात पडले आहेत. एका 11 वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव तयार केला. Plot kidnapping
शाळेला बुट्टी मारल्याने पालक रागावू नये म्हणून त्याने अपहरणाची कहाणी तयार केली. टीव्हीवरचे क्राईम शो पाहून या मुलाने स्वतःच्या अपहरणाची कथा तयार केल्याचे तपासात उघड झाले. मुलगा घरी पोचल्यावर त्याला पालकांनी शाळेतून उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने आपले एका मालवाहूचालकाने अपहरण केले. Crime news आपण त्याच्या तावडीतून कसाबसा सुटलो अशी कहाणी प्रकरण पोलीस ठाण्यात पोचल्यावरही वारंवार सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गांभीर्य दाखवत मुलाने सांगितलेल्या मेटाडोरचा नंबर व चालकाची महामार्ग तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर देखील तपास पथकाच्या हाती सुगावा लागला नाही. अखेर काही तासांनी पोलिसांनी विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कहाणी पुढे आली. अगदी सहज दृष्टीस पडणा-या टीव्हीवरील क्राईम सिरीयल आणि हातात असलेले मोबाईलवरचे गुन्हे विषयक कार्यक्रम आणि गेम्स यामुळे अल्पवयीन मनांवर किती खोलवर परिणाम केलाय याचे हे ताजे उदाहरण म्हटले पाहिजे. Crime shows