News 34 chandrapur
पोंभुर्णा - जन्मदात्या बापाने मुलाला संपविल्याचा थरार जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात घडला. घरगुती वादातून हा रक्तसंहार घडल्याचे पोलीस सांगत आहेत.या घटनेने जिल्हा हादरला आहे.समीर कन्नाके ( वय 20 ) असे मृतकाचे नाव आहे.आरोपी वडीलाला पोलीसांनी अटक केली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील मोहाडा (रै) येथील बंडु शिवराम कन्नाके यांचे आपल्या मुलाशी अधूनमधून भांडण व्हायचे. दिड महिन्यांपूर्वी मृतक समीरने आपल्या वडीलाला बेदम मारहाण केली होती. यात वडील गंभीर जखमी झाले होते. गंभीर दुखापती मुळे वडीलाला नागपूर येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचार घेऊन वडील गावी परतले होते.परत वाद नकोय म्हणून वडील तीन दिवसांपासून पत्नी व मुलीसह शेतातील झोपडीत राहत होता.समीरने गुरूवारचा रात्री नऊ वाजता शेत गाठून तुम्ही शेतात राहत असल्याने लोकं माझ्यावर बोट ठेवत आहेत,यावरून वाद घातला. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. Crime chandrapur
यातच रागाचा भरात वडीलाने काठीने समीरचा डोक्यावर आणि छातीवर वार केला.यात समीरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व पोभुर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.