News 34 chandrapur
चंद्रपूर - एकेकाळी जिवाभावाची मैत्री व एकाच पक्षात असणारे आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांची 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात भेट झाली.
आमदार मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार यांना भाजप पक्षात प्रवेश देत जोरगेवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. political enemy
जोरगेवार यांनी अनेक आंदोलनात मुनगंटीवार यांच्यासोबत अनेक आंदोलनात सहभाग दर्शविला होता, चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जाती ला आरक्षित झाल्यावर जोरगेवार यांनी भाजप पक्षाकडून आमदारकी साठी आपली दावेदारी सादर केली.
मात्र वरिष्ठ पातळीवर त्यांच्या उमेदवारीला नकार देण्यात आला.
जोरगेवार यांनी हार न मानता शिवसेना पक्षात प्रवेश घेत विधानसभा निवडणूक भाजप उमेदवारांच्या विरोधात लढविली.
जोरगेवार निवडणूक हरले मात्र त्यांचा आत्मविश्वास कायम होता त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत, स्वतःची संघटना स्थापन करीत समाजसेवेची व नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम केले. Political friendship
पुन्हा विधानसभा निवडणुकीत पूर्ण आत्मविश्वासाने निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले.
एकीकडे भाजपचे मंत्री व जेष्ठ नेते तर दुसरीकडे कोणताही पक्ष नसताना फक्त जनतेचा पाठिंबा सोबत घेत जोरगेवार मैदानात उभे राहिले. India@75
10 वर्षे चंद्रपूर विधानसभा भाजपच्या ताब्यात राहिली होती मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी प्रचंड मताधिक्य घेत निवडून आले. Independence day 2022
त्यानंतर भाजप विरुद्ध अपक्ष आमदार असा सामना चंद्रपूर विधानसभेत सुरू झाला, अनेक कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार व जोरगेवार यांच्या खडाजंगी उडाल्या होत्या, आझाद बगीचा नूतनीकरण कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभात मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा सामना सर्व नागरिकांनी बघितला. Political drama
महाविकास आघाडी सरकारला समर्थन अपक्ष आमदार जोरगेवार यांनी दिले होते मात्र अडीच वर्षांनी पुन्हा भाजप सत्तेत आली व सर्व राजकीय समिकरण बदलले.
म्हणतात न राजकीय विरोध हा केवळ राजकारणापुरता असतो, राजकारणात फक्त कार्यकर्ते एकमेकांशी भांडतात, पण नेते हे आपली मैत्री कायम ठेवतात. Mla mungantiwar
मुनगंटीवार पुन्हा मंत्री बनले, 15 ऑगस्ट ला मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांचा एकमेकांशी सामना झाला, मात्र यावेळी आमदार जोरगेवार यांनी स्मितहास्य देत मुनगंटीवार यांनी मंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
राजकारणात कुणी एकमेकांचे वैरी नसतात, वैर हे फक्त राजकारणापुरतेचं मर्यादित असतात.
