News34 chandrapur
चंद्रपूर - 15 ऑगस्टच्या पूर्व संध्येला चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन अंचलेश्वर गेटच्या आतील असलेल्या छताचा भाग कोसळला.एकीकडे स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चा जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे चंद्रपुरातील ऐतिहासिक वास्तुकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
चंद्रपूर शहराची ओळख ही ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्यामुळे आहे मात्र या किल्ल्यांची आज दुरावस्था झाली आहे. India@75
चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसाने किल्ल्याच्या अनेक भिंती कोसळत आहे. Independence day 2022
अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या या वास्तूच्या भिंती कमकुवत झाल्या आहे, यामुळे नागरिकांना शक्यतोवर या भिंतीपासून लांब रहावे.
कमकुवत झालेली किल्ल्यांच्या भिंतीची डागडुजी व्हावी यासाठी इको प्रो पाठपुरावा करीत आहे मात्र अजूनही इको प्रो च्या मागणीकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही. Historical Gondkalin Fort
ज्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तूच्या भिंती कमकुवत झाल्या असतील त्याठिकाणी प्रशासनाने युद्ध पातळीवर डागडुजी करायला हवी. Anchaleshwar gate
शहरातील ऐतिहासिक वास्तू बाबत अनेक राजकारणी आपल्या भाषणात प्रामुख्याने उल्लेख करतात मात्र त्या वास्तूंची काय दुरावस्था झाली आहे याबाबत कधी कुणी काही बोलत नाही. Department of Antiquities
14 ऑगस्टला रात्री 10 च्या सुमारास अंचलेश्वर गेट मधील एका भागातील मोठे दगड खाली कोसळले, गेट मध्ये आश्रयास असलेली महिला बचावली.
चंद्रपूर शहरात प्रवेश करायचा असेल तर पठाणपुरा गेट, अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट, बिनबा गेट, बगड खिडकी, हनुमान खिडकीतून यावं लागते मात्र आज या ऐतिहासिक वास्तू डागडुजी ची वाट बघत आहे.


