News34 chandrapur
चंद्रपूर - कोरोना विषाणू ची भयंकर महामारीत देशात लॉकडाऊन लागला, या काळात नागरिक घराबाहेर पडले नाही त्यामुळे विजेचा वापर वाढला.कोरोना काळातील वीज बिल थकबाकी माफ करण्याची वारंवार विनंती करण्यात आली मात्र महावितरण ची आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने त्यांनी विजबिलात कसलीही सवलत मिळणार नाही असे सांगितले. Overdue electricity bill
मात्र राजकीय पुढाऱ्यांनी नागरिकांना वीज बिल भरू नका असे आवाहन केले, विशेष म्हणजे पुढाऱ्यांनी स्वतः घराचे वीजबिल भरले होते. arrears
आज अनेक नागरिकांवर विजबिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, महावितरण वारंवार नागरिकांना विनंती करीत वीजबिल भरण्याचे आवाहन करीत आहे.
महावितरणच्याया आवाहन नंतरही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांचे वीज कनेक्शन महावितरण द्वारे कापण्यात येत आहे. Msedcl employee
आज ही वीज वितरणाचे कर्मचारी वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी नागरिकांच्या घरी जात आहे.
मात्र अनेकदा वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या अंगावर जात त्यांना मारहाण करण्याचा प्रकार सध्या जोरात सुरू आहे.
अशीच एक घटना 25 ऑगस्टला चंद्रपूर शहरातील रयतवारी भागात घडली. Mseb worker
रयतवारी येथील डिस्पेन्सरी चौकातील नागेशवर लक्ष्मण कलवल या वीज ग्राहकाकडे 20 हजार 176 रुपयांची थकबाकी वसूल करण्याकरिता गेले होते.
नागेश्वर कलवल यांना थकीत वीजबिल भरण्याबाबत महावितरणचे तंत्रज्ञ प्रमोद रणदिवे व स्वप्नील आखरे यांनी विचारणा केली असता त्यांनी थकीत वीज भरण्याबाबत काही सहकार्य केले नाही. Electricity distribution employees beaten
नाईलाजाने कर्मचाऱ्यांना कलवल यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला, वीजपुरवठा का खंडित केला म्हणून अजय नागेश्वर कलवल यांनी अश्लील शब्दात महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत गालावर थापड मारली.
जोपर्यंत वीज पुरवठा सुरू करणार नाही तोपर्यंत इथून तुम्हाला जाऊ देणार नाही अशी धमकी दोघांना दिली. Recovery of electricity bill
दोन्ही कर्मचाऱ्यांनी नियंत्रण अधिकारी प्रतीक कुहीटे यांना सम्पर्क करीत घडलेला सर्व प्रकार सांगत येण्याची विनंती केली.
प्रमोद कुहीटे त्याठिकाणी पोहचले असता त्यांच्यासमोर पुन्हा अजय कलवल यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करीत रणदिवे यांची कॉलर पकडत धक्काबुक्की केली.
घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशन गाठत अजय कलवल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलीसांनी विविध कलमानव्ये अजय कलवल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.