News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल येथील मागील 30 वर्षापासुन कार्यरत सक्सेस कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर या संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल एमकेसीएल च्या 22 व्या स्थापनादिना निमित्य सन 2022 चा महाराष्ट्र बेस्ट MS-CIT अचिव्हमेंट अवार्ड भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर व एम.के.सी.एल. व्यवस्थापकीय संचालीका डाॅ.विना कामथ यांच्या हस्ते मुंबई येथे नेहरू ऑडिटोरियम हाॅल येथे सक्सेस काॅम्युटर चे संस्थाप्रमुख नितीन येरोजवार यांना महाराष्ट्राचा पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सक्सेस कॉम्प्युटर एज्युकेशन हे केन्द्र तालुक्यात नव्हे तर संपुर्ण जिल्हात प्रसिद्ध आहे कारण या संगणक केन्द्रामध्ये अनेक मान्यवर तथा व्यावसायिक यांनी प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेत विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यासोबतच विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी ला पोषक असे मार्गदर्शन करून आज उच्चपदस्थ पदावर विराजमान आहेत हेच यशाचे गमक आहे असे येरोजवार यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.
मुंबई येथे एमकेसीएलच्या 22 व्या स्थापना दिनानिमित्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील अधिकृत केन्द्रातील पुरस्कार प्राप्त सर्व संचालकाना आमंत्रित करण्यात आलेले होते. याच बरोबर MKCL यांच्या वतीने आयोजित केलेला केंद्र संचालकाचा स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या केंद्र प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यास एलएलसी चंद्रपूर चे को-ओर्डीनेटर लक्ष्मीकांत कांबळे,प्रविण श्रीकोडावार, निलम के. नफीस अहमद तथा सर्व एमकेसीएल चे कर्मचारी व संपुर्ण महाराष्ट्रातील संगणक संस्थेचे संचालक उपस्थित होते.
