News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल- : सद्या स्थितीत शेताकडे रानटी डुकराचे wild boar हैदोस वाढले असल्याने शेतकऱ्याला दिवस असो की,रात्र नेहमीच जाऊन पाहणी करावी लागत आहे. याच निमित्याने शेतात पाहणी करीता व काही कामानिमित्त गेलेल्या युवा शेतकऱ्याला विजेचा धक्का बसल्याने शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना मूल तालुक्यातील बोरचांदली शेतशिवारात रात्रौ 10 वाजता दरम्यान घडली.
मुल येथील प्रमोद वसंतराव चटारे वय( 43) वर्ष रा असे युवा शेतकऱ्याचे नाव आहे. Electric shock
मुल येथील प्रमोद वसंतराव चटारे वय( 43) वर्ष रा असे युवा शेतकऱ्याचे नाव आहे. Electric shock
मूल येथील माऊली इलेक्ट्रिक दुकानाचे संचालक तथा युवा शेतकरी प्रमोद वसंतराव चटारे हे गुरुवारी रात्रौ बोरचांदली येथील शेतावर गेले होते. त्यांच्या शेतात विज आहे. त्याच ठिकाणी अचानक त्याला विजेचा धक्का बसला. सोबत असलेल्या एका व्यक्तीने सदर घटना बोरचांदली येथे येऊन काही नागरिकांना सांगितले. नागरिकांनी त्याला विज प्रवाहापासून दूर करीत विज वितरण कंपनीला माहिती दिली.उत्तरीय तपासणीसाठी रात्रौ सावली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार असून अचानक प्रमोद चटारे यांचे निधन झाल्याने मुल परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. बोरचांदली येथे काही पार्टनर मिळून सामूहिक शेती केली. त्यात सोयाबीन पिकाची लागवड केल्याचे समजले. Farmer die