News 34 chandrapur
मुंबई - शिवसेनेच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या रुपात पाहिलंय. त्यानंतर विस्कळीत झालेली शिवसेनेची घडी बसवण्याचं आव्हानही उद्धव ठाकरेंसमोर आहे. शिवाय धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार, यावरुनही चढाओढ पाहायला मिळतेय.त्यासाठीही कागदोपत्री लढा सुरु असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. या सगळ्या अनुशंगाने करण्यात आलेल्या एकूण पाच याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात एका विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. Supreme court hearing
मात्र ही सुनावणी हळूहळू पुढे जात असून या संघर्षाचा निकाल काय असणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. Shivsena vs eknath shinde
आज या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती मात्र आता सदर सुनावणी उद्या होणार असल्याची शक्यता आहे. Maharashtra Political Crisis
न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा, सी. टी रविकुमार, हिमा कोहली या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होते आहे. यापैकी सी टी रविकुमार आज उपलब्ध नसल्याची नोटीस आली आहे. सी टी रविकुमार गैरहजर असल्यामुळे आजची सुनावणी उद्यावर गेली असल्याचं सांगितलं जातंय. तीन जणांच्याच खंडपीठासमोर सुनावणी होणं अपेक्षित असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय. Politics news