News 34 chandrapur
चंद्रपूर- भारत देशाच्या स्वातंत्र्याचे 'अमृतमहोत्सवी वर्षाचे 'औचित्य साधून चंद्रपुरातील निवडक मोलमजुरी करणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीना स्थानिक विकलांग सेवा शिवभोजन केंद्रात मिठाई व सोलापुरी चादरीचे निशुल्क वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला राजुरा येथील सामाजिक कार्यकर्त्या कृतिका सोनटक्के, नवराष्ट्र दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर, विकलांग सेवा संस्थेचे सचिव देवराव कोंडेकर, अशोक खाडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन विकलांग सेवा संस्था संयोजिका पूजा पान्हेरकर यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला संजय डाखोरे, किरण मानकर,प्रीती येरमे ,वंदना मानवटकर, खुशाल ठलाल, शिक्षिका सौ श्रद्धा विघ्नेश्वर यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली होती.