News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना अनेकांनी मोठया प्रमाणात दारू तस्करी केली होती, दारूबंदी उठली आणि तस्करांचा बाजार सुद्धा, मात्र आता ज्या राज्यात दारूबंदी आहे त्याठिकाणी दारूची तस्करी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वाहनांचा उपयोग करण्यासाठी बुलढाणा व गुजरात मधील चोरांनी वाहने चोरी केली. Chandrapur crime20 ऑगस्टला शास्त्रीनगर व भवानजी भाई हायस्कुल जवळ राहणारे पंकज मिश्रा व मानविर सिंग ठिल्लर यांनी चारचाकी वाहन चोरी गेल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
घटनेची गंभीरता बघता पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि हर्षल एकरे यांना प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले. Chandrapur police
गुन्हे शोध पथकातील चमूने घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले, त्याआधारे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहन जुनोना रोड बाबूपेठ परिसरात आढळून आले.
गुन्ह्यात वापरलेली Tata अट्रोस वाहन क्रमांक MHGJ02DM0559 ताब्यात घेत वाहन मालकाची माहिती काढण्यात आली.
32 वर्षीय सतनाम सिंग प्रतापसिंग बावरी, रा. शेदला, मेहकर जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली असता त्याने वाहन चोरी केली असल्याची कबुली दिली. Liquor smuggling
सदर वाहने नातेवाईकांच्या घराशेजारी बुद्धनगर बाबूपेठ येथे असल्याची माहिती दिली, सदर दोन्ही वाहने क्रमांक MH04CA4092 व MH12DS7842 ताब्यात घेण्यात आले.
आरोपी बावरी याची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात गुजरात राज्यातील वडनगर रहिवासी लखनसिंग त्रिपाल सिंग सरदार चा सहभाग आहे व ही वाहने लखनसिंग गुजरात राज्यात दारू तस्करी साठी वापर करणार असल्याची माहिती दिली.
दोन्ही आरोपीवर महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यात घरफोडी, चोरी व अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहे. Burglary
सध्या दुसरा आरोपी लखनसिंग हा फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे.
गुन्हे शोध पथकाने हा गंभीर गुन्हा अवघ्या 12 तासात उघड केला आहे, या गुन्ह्यात आरोपिकडून तब्बल 12 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या घरी व दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे असे आवाहन हर्षल एकरे यांनी केले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, किशोर वैरागडे, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे, अशोक मरसकोल्हे, विनोद यादव, पांडुरंग वाघमोडे व सायबर सेल मधील कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.