News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी अनेक महिलांना शिलाई मशीन वाटप करीत आहे या बाबीचा आम्हाला अभिमान आहे, असे उदगार मनसे महिला मेळाव्यात मनसे प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी काढले. Mns adhikrut
10 ऑगस्टला चंद्रपुरात महिला मनसे द्वारा आयोजित महिला मेळाव्यात प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी, चंद्रपूर संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक सचिन भोयर,भंडारा संपर्क प्रमुख व शहर अध्यक्ष मनदीप रोडे,वाहतूक जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता, विधी विभाग जिल्हाध्यक्ष मंजू लेडांगे, महिला सेना जिल्हाउपाध्यक्ष माया मेश्राम,शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकुर आदींची उपस्थिती होती.
हेमंत गडकरी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनपर संबोधनात राज्य सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नसेल तर नागरिकांनी एकच पर्याय शोधत मनसेला साथ द्यावी, सध्या चंद्रपुरात महिलांचे प्रश्न सोडविण्यात मनसे पदाधिकारी नेहमी अग्रेसर असतात, आगामी चंद्रपूर मनपा निवडणुकीत मनसे किंग मेकर ची भूमिका निभावणार. Mns kingmakers
प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की आज मनसे सत्तेत नसला तर महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिलाई मशीनचे वाटप आमचे सैनिक करीत आहे, येणाऱ्या मनपा निवडणुकीत आपल्या पक्षाचे नगरसेवकांची संख्या कशी वाढणार यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे.
संबोधनांनंतर रिटा गुप्ता यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, सोबतच अनाथ व गरीब मुलांचे विवाह लावून देणाऱ्या शाहीन शेख व बागला हायस्कुल चे मुख्याध्यापक रमेश पायपरे सरांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.